सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर परीट समाजाच्या वतीने संत गाडगे बाबाना अभिवादन

  परतूर (प्रतीनीधी) येथील परीट समाजाच्या वतीने गंज शाळाच्या प्रांगणात संत गाडगेबाबा यांची पुण्यतीथ निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले
          परतूर येथील परीट समाज यांच्या पुढाकाराने येथील केद्रीय प्राथमिळ गंज शाळाच्या प्रारगंणात थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांची पुण्यतीथी साजरी केल्या गेली या प्रंसगि कृउबासमितीचे सभापती कपिल आकात,शिवसेना तालूका प्रमुख आशोक आघाव, नगरसेवक कृष्णा आरगरडे,राजेश खंडेलवाल,भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र मुंदड़ा,माजी नगरसेवक वीजय राखे,पत्रकार संद्याचे माजी आध्यक्ष शामुसंदर चित्तोडा,शिवसंग्राम संघटनेचे वीघार्थी आघाडी तालूका प्रमुख सचिन खरात,सईनी मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष चव्हाण,मनसेचे श्रीरंग धुमाळ,श्रीराम मित्र मंडळाचे गजानन अंभुरे, यांनी संतगाडगे बाबा यांना अभिवादन केले
   कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीट समाजाचे तालूकाध्यक्ष वीकास वाघमारे,सचिव उद्धव वाघमारे उपाध्यक्ष सचिन खैरे,मंगेश वाघमारे,गजानन वाघमारे,

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत