सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शेगाव पंढरपूर महामार्ग राजकीय जीवनातील मोठे यश : बबनराव लोणीकर यांचे तळणी येथे प्रतिपादन

तळणी : (रवि पाटील ) माझ्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनातील शेगाव पंढरपूर मार्ग निर्मीतीचे  मोठे यश असुन त्यामुळेच मंठा परतूर मतदार संघाचे वैभव वाढले असुन रोजगार वाढीसाठी हा रस्ता नावलौकीकास येत असल्याचे त्याने सांगीतले  केद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्या कडे पाठपुरावा करून या रस्त्यासाठी मोठा निधी मिळवून विकासाला चालना दिली असुन शेत जमीनी खरेदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली असुन भविष्यातील व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक होत असल्याने येणाऱ्या काळात मोठी रोजगार निर्मिती व्यवसायाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे  तळणी येथील डॉ रवि गोविदराव देशमुख यांच्या श्री कृपा हॉस्पीटलच्या उदघाटन प्रंसगी त्यानी उपस्थीतांना मार्गदर्शन केले तळणी हे मराठवाडा विदर्भाच्या टोकावरचे गाव असुन आरोग्य सुविधा मिळण्यास अनंत अडचणी आहेत सध्याच्या या रोगराईच्या काळात ग्रामीण भागात म्हणाव्या तशा सुविधा उपलब्घ नसल्या तरी छोटी हॉंस्पीटल हे त्याच्यासाठी आधार आहेत रुग्न सेवा देता सेवा भाव जपूण रुग्नसेवा देणे गरजेचे आहे मोठ मोठी हॉस्पीटल ही गरीबांसाठी आर्थीक दुष्टया परवड नारी नसुन ग्रामीण भागातील डॉक्टरांना त्याच्या भागात सर्वाच्य सेवा करण्याची संधी मिळत असुन त्या सेवेच्या माध्यमातूनच आपला नावलौवकीक सिद्ध झाला पाहीजे असे उदगार माजी मंत्री बंबनराव लोणीकर यांनी यां प्रंसंगी काढले

या प्रंसगी स्वामी श्रीकृष्ण चैतन्य महाराज युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर सतिश राव निर्वळ भगवान देशमुख शरद पाटील नितीन सरकटे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्य ज्ञानेश्वर सरकटे गोविंदराव देशमुख आबासाहेब सरकटे सोपानराव पाटील आदीची मोठी उपस्थीती यांप्रंसगी होती

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत