सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रामनगर सर्कलमधील तरुणांचा मनसे विद्यार्थी सेनेत प्रवेश



जालना(प्रतीनीधी) जालना तालुक्यातील रामनगर सर्कलमधील तरुणांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मनसे राज्य सरचिटणीस तथा मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली   महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे, जालना तालुका अध्यक्ष सचिन एरंडे, मनसे जालना तालुका ऊपाध्यक्ष कृष्णा खलसे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मनसे विद्यार्थी सेना मध्ये जाहिर प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांच्या विचारधारेवर आपण ठाम राहुन तरुणांना सोबत घेऊन आपण पुढची वाटचाल जोरात करणार असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेेमध्ये रामभाऊ कातकडे, गणेश कातकडे, आरूण नागवे, विलास काटकर, भगवान काटकर, सिध्देश्वर खांडेभराड, अनिल कातकडे, गजानन लोखंडे, योगेश नागवे, प्रदिप खांडेभराड, संजय  खांडेभराड, प्रकाश खांडेभराड, बालाजी शेळके,अमर जाधव, दिपक राऊत,विष्णू कुंडकर विलास डुकरे, खांडेश्वर गायकवाड, निवृत्ती भालेकर, कृष्णा काटकर, सचिन चौधरी,  आदि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत