सोनदेव येथे 258 नागरिकांनी घेतली कोरोनाची*लस.,ज्ञानेश्वर शेजुळ यांनी केला मोहीमेचा शुभारंभ,.नागरिकांनी मानले पंतप्रधान मोदीव आमदार लोणीकर यांचे आभार

जालना 
{प्रतिनिधी} गेल्या वर्षभरापासुन कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असल्याने जनता भयभीत झालेली आहे.अनेक महीण्यापासुन सर्वसामान्य शेतकरी ,शेतमजुर,छोटेमोठे व्यापारी लाॅकडाऊन असल्यामुळे सर्वच क्षेत्रातील जनता भयभीत व परेशान आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारची मदत केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर उपाय म्हणुन संपुर्ण देशातील नागरिकांसाठी मोफत लस उपलब्ध करुन दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री तथा परतुर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकाराने आज दि.10/04/2021 रोजी सेवली प्रा.आ.केंद्राअंतर्गत मौजे सोनदेव येथे 45 वर्षावरील नागरिकांसाठी मोफत लसिकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या लसिकरणाच्या कार्यक्रमाचा भा.ज.पा.चे जालना जिल्हाउपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमात जवळपास 258  नागरिकांनी लसिकरणाचा लाभ घेतला आहे.सोनदेव येथे पहीले लसिकरण श्रीमती कुशीवर्ताबाई रावसाहेब खांडेभराड यांचे करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल व आमदार लोणीकरांनी लसिकरणासाठी पुढाकार घेतल्याने नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आमदार बबनराव लोणीकर यांचे आभार मानले आहेत.
मौजे सोनदेव येथील नागरिक पुरुष व महीलांनी लसिकरणासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतल्याने आज पर्यंत जालना तालुक्यातील हे सर्वाधिक लोकांनी लस घेतल्याची नोंद झाली आहे.
हा लसिकरणाचा कार्यक्रम चालु असतांना मा.मंत्री तथा आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी सेवली प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.दिनेश कुलकर्णी यांच्याकडुन चालु असलेल्या लसिकरणाचा भ्रमणध्वनीद्वारे आढावा घेतला.व नागरिकांनी मोठ्याप्रमाणात दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भा.ज.पा.चे जालना जिल्हाउपाध्यक्ष,ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ,प्रा.आ.केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.दिनेश कुलकर्णी,सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानदेव सखाराम ढाकणे,श्री मदन सोळुंके,श्री भगवान माघाडे,आरोग्य कर्मचारी मंगेश बारवकर,श्रीमती 
जोसेफ मॅडम,श्रीमती गुंजाळे मँडम,श्रीमती पडघान मॅडम,श्री हगवणे,श्री तारु,श्री खाडे, श्री राम हेगडकर {सर} श्रीमती मराठे मॅडम,श्री गजानन शेजुळ,अंगणवाडी कार्यकर्ती,आशा वर्कर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश