सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मनसेच्या प्रयत्नाला यश, संजीवनी हॉस्पिटलची होणार चौकशी




जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये काळा बाजार व गोर गरीब रुग्णांची आर्थिक लुट व तसेच रुग्णांना चांगले ऊपचार  मिळत नसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली आसता. जालना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांचे स्विय्य सहाय्यक खेडेकर यांनी पत्र काढुन येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जालना येथील संजीवनी हॉस्पिटलची चौकशी करुन हाॅस्पीटलचा कारभार व हाॅस्पीटलचा रेकॉर्ड मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांना देणार आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील ज्या रुग्ण नातेवाईक यांना ईतर ठिकाणी हाॅस्पीटल व ईतर समस्यांचा सामना करावा लागत आसेल तर आपल्याशी संपर्क साधावा कोरोना  काळामध्ये वाढणारे हॉस्पिटलचे बिल व मदत केली जाईल आसी माहीती काकडे यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत