सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

श्रीष्टी_आरोग्य_उपकेंद्रावर_भजयुमोच्या वतीने रक्तदान,62 रक्तदात्यांनी केले रक्तदान,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युमो महामंत्री राहुल लोनिकरांच्या नेतृत्वात युवमोर्चाने घेतला पुढाकार


परतूर (प्रतिनधी) कोरोना संकट काळात सर्वत्र रक्त तुटवडा निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बबनराव लोणीकर मार्गदर्शनाखाली, व भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो ता #अध्यक्ष_शत्रुघ्न_कणसे,व श्रीष्टी चे सरपंच जितू अण्णा अभुरे यांनी पुढाकाराने रक्तदान शिबिर संपन्न झाले.
 प्राथमिक आरोग्य केंद्र श्रीष्टी येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा तालुकाध्यक्ष रमेशराव भापकर,यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी,पं स सदस्य शिवाजी पाईकराव,गटविकास अधिकारी श्री अंकुशजी गुंजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ जाहेद सय्यद,आष्टी पोलीस निरीक्षक श्री सुभाष सानप, वसंतराव बेरगुडे यांची  प्रमुख उपस्थिती होती
या रक्तदान शिबिरात 62 रक्तदात्यांनी रक्तदान करून देशसेवेस हातभार लावला
भाजपा युमो तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे व भाजपा व युवा मोर्चा परतुर, यांच्या पुढाकाराने राज्यातील रक्ताची भीषण टंचाई लक्षात घेत संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरामुळे कोरोना काळात जनसेवा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले

यावेळी सोबत  सरपंच केशव ढवळे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रोहिदास टीप्परकर, सर्जेराव आघाव,पंडितराव आवटे, सुरेशराव भुंबर,ओम बोरकर, धनंजय अंभुरे गोरख गाडगे,संभाजी शिंदे संतोष रेपे अजय चव्हाण, यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत