मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन कार्यक्रमाचे आयोजन


 मंठा (सुभाष वायाळ)दि. 7 मंठा तालुक्यातील वायाळ पांगरी येथे भव्य दिव्य असे श्री हनुमान मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरामध्ये श्री हनुमानाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण निमित्त तीन दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या दिवशी दिनांक 06 रात्री ठीक 08वाजता श्री ह. भ.प. हरिभाऊ महाराज पांगरी कर यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी दिनांक 07 श्री ह भ प श्रीरंग महाराज वाहेगावकर यांचे कीर्तन रात्री ठीक 08 वाजता ठेवण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी दिनांक 8 रोजी श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन कार्यक्रम श्री ह.भ. प. छगन महाराज टाकळीकर यांच्या हस्ते होणार आहे. व दुपारी 01वाजता गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे गावकऱ्यांच्या वतीने विनंती व आव्हान  करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमासाठी गावातील महिला, पुरुष, लहान बालक व भजनी मंडळी परिश्रम घेत आहेत.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार