सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जय जवान, जय किसान' संघटनेची बैठक संपन्न

जालना (समाधान खरात)शासकीय विश्रामगृह जालना येथे 'जय जवान, जय किसान' संघटनेची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन जय जवान जय किसान संघटनेचे जालना जिल्ह्याध्यक्ष ज्ञानेश्वर भुसारे यांनी केले होते. या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून जय जवान जय किसान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे उपस्थित होते. त्यांनी या ठिकाणी आलेल्या संघटनेच्या सैनिकांना मार्गदर्शन केले.

ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, जय जवान जय किसान या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी व तरुणांसाठी खूपच चांगल्या प्रकारे काम जालना जिल्ह्यात सुरु आहेत. आपल्या संघटनेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. सतत आपण आपले काम सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे आहे. आपण समाजात काम जर सुरू ठेवले तरच आपली प्रगती होईल व आपल्या संघटनेचे काम पण चांगल्या प्रकारे सुरू ठेवता येईल. आपल्या संघटनेच्या प्रत्येक सैनिकांने कोणत्याही कामात स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे. सतत समाजात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण लढले पाहिजे. गोरगरिबांच्या मदतीसाठी आपण सतत धावले पाहिजे तरच आपण जय जवान जय किसान संघटनेचे सैनिक आपल्या म्हणता येईल. आपल्या कामाची समाजावर छाप पडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी 'जय जवान, जय किसान' या संघटनेचे राष्ट्रीय  अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत व तसेच मराठवाडा अध्यक्ष हनुमान कदम व जालना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भुसारे यांच्या हस्ते जालना तालुकाध्यक्ष प्रल्हाद ढवळे, जालना सचिव गजानन शेजुळ व घांसावगी तालुकाध्यक्ष गणेश कोरडे यानां संघटनेची नियुक्ती पत्र देण्यात आले. नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला अभिषेक वडगांवकर, अमोल चोथे, रमेश शिंदे, विष्णू पाटील,  प्रल्हाद ढवळे, रवि सुरसे, राजेश काळे, रमेश खेत्रे, गजानन शेजुळ, तेजराव गंगावणे, राहुल बोबडे, कमांडो पद्माकर चंदनशिवे व डी.एफ.निंबाळकर यांची उपस्थिती

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत