सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रोहन आकात" यांच्या वतीने स्वखर्चाने गरजुवंतांना वरफळ येथे रगीचे वाटप

"

परतूर/ प्रतिनिधी(शेख अथर )


समाजाचं काही देणं लागतो ही युक्ती मनात ठेवून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन आकात यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जेष्ट नेते विलास आकात यांच्या हस्ते वरफळ गावातील गरजूवंतांना रगीचे वाटप करण्यात आले
भाजपा तालुका सरचिटणीस सुधाकर बेरगुडे यांनी यावेळी सांगितले की सामाजिक भान ठेवत नेहमीच विलास आकात व रोहन आकात यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येतात परंतु आज जो गोरगरीब व गरजूवंतांना थंडीच्या दिवसात आवश्यक असलेल्या रगी वाटप करून एक आदर्श कार्य केल्याचे सांगितले
यावेळी सरपंच नदीम पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले
यावेळी मधुकर गोरे,शेख रउफ,साहेबराव घोंगडे,खाजा भाई,जीवन रेंगले, गुलाब सावंत,आसेफ भाई, योगेश खंडागळे बशीर भाई रणजीत बेरगुडे, दत्ताभाऊ डोईजड,गजानन गोरे,संजय गोरे,जानकीराम गोरे,तसेच बबन दादा आकात यासीन भाई जफर भाई दत्तात्रेय आकात कैलास आकात,पाशा भाई,यांच्यासह अनेक मान्यवर व गावकऱ्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत