परतूर तालुक्यात नवीन साखर कारखाना निर्माण होणार... मनसे नेते दिलीप- बापु धोत्रे===============

परतूर /हनुमंत दवंडे 
मराठवाडा दौरयाच्या अनुषंगाने,दि.३० जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यातील परतूर शहरातील शासकीय विश्रामगृहमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक मनसे नेते मा.दिलीप(बापू)धोत्रे, मार्गदर्शन करताना  म्हणाले की परतूर मंठा तालुक्यातील स उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्न लक्षात घेता परतूर मंठा तालुक्यात नवीन साखर कारखाना निर्माण करण्याची इच्छा आहे,लवकरच साखर उद्योग सुरू करु असंही धोत्रे म्हणाले, श्री धोत्रे यांच्या कडे पंढरपूर सोलापूर धाराशिव या ठिकाणी त्यांच्या मालकीचे दोन साखर कारखाने आहेत, त्यांनी मागच्या आठवड्यात पंढरपूर येथे इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन करून प्रकल्पाला सुरुवात केली आहे, पक्ष वाढविण्याच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक केले, प्रदेश सरचिटणीस मा.संतोष(भाऊ)नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.यावेळी जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, बालाजी मुंडे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष,परभणी जिल्हाध्यक्ष राज शेख,परभणी परभणी जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, रामजी नवल जिल्हा उपाध्यक्ष,मंठापरतूर तालुका अध्यक्ष कृष्णा गोवर्धन सोळंके,मंठा तालुका अध्यक्ष गणेश ज्ञानेश्वर बोराडे,परतूर तालुका संघटक वैजनाथ बन,तालुका उपाध्यक्ष भारत शेळके,परतूर शहराध्यक्ष सोपान गोरे,उपशहराध्यक्ष विश्वंभर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर केवारे,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष महेश धापसे,माजी जिल्हाउपाध्यक्ष ऍड.राजेश खरात,रामेश्वर घुंगराट, सवाईराम राठोड,विलास काळे शाम देवडे,मंठा माजी शहराध्यक्ष संजय हानवते,आदित्य केंदळे अर्जुन मोहिते, तुकाराम कदम, अर्जुन नवले, गजानन झोल, अमोल सरोदे, मोहन सरोदे,राम गटकळ, कृष्णा बापु सोळंके यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते...

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.