सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सेवली जालना रोडवर दोन मोटरसायकल समोरा समोर धडकल्याने एक ठार तीन जखमी ================


परतूर /हनुमंत दवंडे
. जालना तालुक्यातील सेवली जालना रोड वर सेवली पासून १ किमी अंतर वर अपघात झाला  गोविंद धर्मा चव्हाण राहणार वय 48 व जखमीचे नाव बळी धना राठोड वय 50. सेवली वरून आपल्या घरी  जात असताना समोरून भागडे सावरगाव येथील दोघीजणी येत असताना त्यांच्या गाडीने धडक दिल्याने हे चौघेही जखमी झाले .त्यामध्ये जखमी बळीराम राठोड, गजानन इंगळे, वय 30 व किशोर सदावर्ते वय 35 मोटर सायकल नंबर एम .एच. 21 बी. टी. 50 42 व दुसरी मोटरसायकल एम .एच. 28 3709  या दोन मोटारसायकली  व जखमींना सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता या केंद्रामध्ये एकही डॉक्टर नसल्याने दवाखान्यामध्ये दोन ते तीन तास जखमी तडपत पडले होते .नंतर जखमींच्या नातेवाइकांनी जखमींना खाजगी वाहनातून जालना येथे नेण्यात आले सेवली  येथे ॲम्बुलन्स  असताना ॲम्बुलन्स मध्ये डिझेल टा का यला सांगितले त्यामुळे नातेवाईकांनी खाजगी वाहन करून जालना येथे गोविंद धर्मा चव्हाण या जखमींना जालना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता जालना सिविल हॉस्पिटल  मधील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. तीन जखमी चा उपचार जालना येथे चालू आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत