नगरपरिषद परतूर मध्ये पाणीपुरवठा विभागाचे तीन तेरा नऊ बारा अभियंता घाटेकर असून अडचण नसून खोळंबा


परतूर / हनुमंत दवंडे
    परतूर नगर परिषद चे पाणी पुरवठा विभाग म्हणजे तमासगीर यांचा खेळ झालेला आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता घाटेकर यांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील पाणीपुरवठा कोलमडलेली आहे. घाटेकर हे एक तर ऑफिस मध्ये नसतात त्यांना मोबाईलवर कॉल केल्यावर कॉल घेत नाहीत मोंढा भागातील पाण्याच्या टाकी मागे गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागरिकांना अर्ध्या भागात पाणी मिळत नाही घाटेकर यांना मोबाईलवर अनेकदा सूचना केल्या असतात दोन दिवसात करतो एक दिवसात करतो असे उडवाउडवीचे उत्तर देतात परत फोन केल्यावर फोन रिसीव्ह करीत नाहीत .बऱ्याच दिवसांपासून या भागातील नागरिक पाण्यामुळे त्रस्त झालेले आहे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे जर नागरिकांना विकतच पाणी घ्यायचा असेल तर नगर परिषद पाणी पुरवठा विभागातील अभियंता घाटेकर यांच्यावर का खर्च करत आहे हेच कळत नाही  तसेच नागरीकांनी ही नळपट्टी का भरावी हा प्रश्न निर्माण होत आहे मुख्यअधिकारी यांना फोन लावल्यास त्वरित फोन उचलून संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवतात परंतु यामधील टेक्निकल प्रॉब्लेम जो आहे तो अभियंता घाटेकर यांनाच माहीत असेल मुख्य  अधिकारी सांगूनही घाटेकर हे काही या विभागाकडे लक्ष देण्यासाठी तयार नाहीत घाटेकर यांना कशाचा माझं चाढलाय हेच कळत नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे घाटेकर कुठल्याही नागरिकांना पत्रकारांना जुमानत नाही कोणाच्याही कॉल रिसीव करत नाहीत आठ-आठ दिवस रस्त्यावर खड्डे करून पाणीपुरवठ्याचे पाईप जोडण्याचे काम चालू असल्याचे भासवत असतात कधीही ऑफिसमध्ये गेल्यास त्यांची बिले काढण्यात व्यस्त असतात त्यांना नागरिकांशी काही घेणं देणं नाही यावरुन असे दिसत आहे .
     तरी प्रशासन वेळेवरच  घाटेकर यांना आवर घालावा नसता संतप्त नागरिकाना रस्त्यावर उत्तरल्या शिवाय पर्याच उरणार नाही 
      या पाणि पुरवठा हा काही मोंढा भागापूरताच वीषय नसून पूर्ण शहरात महीना पंधरा दिवसात काही ना काही समस्या उद्भावतच असतात येत्या  निवडणूकित या पाणि पुरवठा मुळे बऱ्याच जन्नाना नारल मिळणार  असे दिसून येत आहे 
     तरी प्रशासनाने हालचाली करून नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करावा अशी मागनी होत आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार