महात्मा गांधी चे विचार प्रत्येकानी आत्मसात करावेत...-.खवल.


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे :भारत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी महात्मा गांधीजी नी आयुष्य च्या शेवटच्या घटका पर्यंत अहिंसे च्या मार्गाने  प्रयत्न केले त्यांच्या मुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या विचारांची आजही आपल्याला गरज असल्याचे प्रतिपादन सी. एन. खवल यांनी सांगितले.पाटोदा येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालय  आयोजित महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम ते बोलत होते.
           कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी पाराजी रोकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव खवल , विदयानंद  सातपुते यांची उपस्थिती होती.
           पुढे बोलतांना खवल म्हणाले कि अहिंसा,असहकार व  स्वावलंबन,या सारख्या बाबी चा विचार करण्याची गरज आजही भासत आहे.
सूत्रसंचालन धनंजय जोशी तर आभार प्रदर्शन पांडुरंग डवरे यांनी केले.
  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश वखरे ,विष्णू रोडगे, मस्के, केशव गायकवाड यांनी प्रयत्न केले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी