सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

भीमराव मनाजी तरवटे यांच्या प्लॉटवर नगरपरिषदने केले अतिक्रमण उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

परतूर/हनूमंत दंवडडे
भीमराव मनाजी तरवटे यांचा प्लॉट आदर्श कॉलनीत असून सर्वे नंबर 138 मधील प्लॉट क्रमांक 64 व र नगरपरिषदेने अतिक्रमण केले आहे. हा प्लॉट सदर इसवी सन 2004 मध्ये खरेदी केलेला आहे बाबुराव बापूराव घरत यांच्याकडून त्यांनी विकत घेतलेला प्लॉट आहे .त्याची सदरील रजिस्ट्री, मालकी हक्क प्रमाणपत्र, नगरपरिषद कार्यालयाची रिविजन नक्कल, नकाशा, हे सर्व डॉक्युमेंट्स भिमराव तरवटे यांच्या नावाने आहेत. तरीसुद्धा त्या ठिकाणी नगर परिषद चे काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी सदरचे काम हे गुत्तेदार यांनी घेतलेले आहे त्यांनी तरवटे यांचा प्लॉट कंपाऊंड वॉल मध्ये घेण्यात आलेला आहे . तो काढण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद व पोलिस प्रशासनास निवेदन दाखल केले आहे. तरी याची त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत