सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

एकनाथ कदम यांची इसा संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड.....

    परतूर (हनुमंत दवंडे)  येथील एकनाथ कदम यांची इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोशियन (इसा ) इंग्रजी संस्थाचालक च्या जिल्हाकार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली
    या संघटनेचे संस्थाचालक भारत भांदरगे यांनी एका पत्रकाद्वारे एकनाथ कदम यांची नियुक्ती केली या पत्रकात म्हटले आहे आपण संस्था  स्थापनेपासून कार्यरत आहात आपण संस्था च्या बांधणीसाठी व विस्तारासाठी सदैव प्रयत्नशील आहात आपल्या या कामाची दखल घेत आपल्याला ज्यांना जिल्हा कार्याध्यक्षपदी जवाबदारी देण्यात येत आहे  आपल्या काळात आपण संघटनेचे जोमाने प्रचार व प्रसार कराल अशी अपेक्षा करण्यात येत आहे
    या निवडीबद्दल माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आमदार राजेश राठोड अन्वर बापू देशमुख संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत भांदरगे मराठवाडा अध्यक्ष संदीप बाहेकर तारीख सिद्दिकी रामप्रसाद थोरात डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर रवींद्र घरकुले शब्बीर शेख डॉक्टर प्रशांत अंभुरे डॉक्टर नाझिर कादरी बालासाहेब आकात प्राध्यापक सुधीर यादव अभय काळुंके  समीर देशपांडे गणेश सोळंके एडवोकेट  झेंडे एन कादरी  डॉक्टर दीपक दिरंगे आदींनी या निवडीबद्दल एकनाथ कदम यांचे अभिनंदन केले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत