सर्व क्षेत्रात श्रेष्ठ क्षेत्र म्हनुन शिक्षण क्षेत्राची ओळख-कपिल आकातपरतूर-विशाखा राखे याची गैरव समारंभपरतूर /हनुमंत दवंडे 
सर्व क्षेत्रात श्रेष्ठ क्षेत्र म्हणून शिक्षण क्षेत्राची ओळख आहे आणि या क्षेत्रात ज्यांना सेवा करण्याची संधी मिळते ते खूप भाग्यवान असतात असे उदगार मंगळवारी ता. 25 रोजी आयोजित ला बहादूर शास्त्री कन्या विद्यालयाच्या सह शिक्षिका  विशाखा राखे यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मराठवाडा सर्वोदय शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात यांनी काढले. या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात,उपाध्यक्ष कुणाल आकात,माजी नगराध्यक्ष विनायक काळे ,माजी उपनगर अध्यक्ष विजय राखे आदी उपस्थित होते.
                            
                   या वेळी पुढे बोलताना श्री.आकात म्हणाले शैक्षणिक क्षेत्रातुन च भारत देशाचा सुजाण  नागरिक घडवण्याचे कार्य होते. आणि ही संधी शिक्षक वर्गाला मिळते त्यामुळे शिक्षक हा खूप नशीबवान व्यक्ती असल्याचे ते म्हणाले.
 या वेळी श्रीमती विशाखा राखे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी श्रीमती वर्षाताई आकात, नगरसेवक अंकुश तेलगड,अखिल काजी, प्रा. भारत खंदारे, प्रा.अंकुश मोरे,मा. प्रा. भगवान दिरंगे,सय्यद आरेफ अली,खयूम भाई पठाण,जमील कुरेशी, स्व.बाबासाहेब भाऊ आकात पत संस्थेचे व्यवसथपक शिवाजी ढगे, मुख्यध्यापक संजय जाधव, शाम कबाडी,तुकाराम जईद,रामराव घुगे,रमेश निर्वळ,श्रीमती माधुरी देशपांडे,श्रीधर डोंगरे,राहुल मूजमुले,वैभव बागल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल काळे यांनी केले तर आभार श्रीमती वृन्दा डक यांनी केले.
.....................    ......

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी