सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

फिरत्या मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून ६५५ कोव्हीड लसीकरणमुख्या बाजार पेठेत होतोय लसीकरण



परतूर/प्रतिनिधी:-हनूमंत दंवडे

शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती सह शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लसीकरण व मास्क अनिवार्य करण्यात आल्याने लसीकरणाचा वेग थोड्याफार प्रमाणात वाढला असून पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता परतूर शहरात फिरते मोबाईल व्हॅन मार्फत कोव्हीड-१९ लसीकरण करण्यात येत असून शहरातील मुख्य बाजार पेठेसह विविध भागात जाऊन लसीकरण करून घेण्यात येत असून ही मोबाईल व्हॅन २३ डिसेंबर पासून शहरात लसीकरण करत आहे आज पर्यंत ६५५ नागरिकांचे या मोबाईल व्हॅन मार्फत लसीकरण करन्यायत आल्याची माहिती देण्यात आली आहे 
या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून,डॉ.स्वाती फलटणकर,लॅब टेक्नीशन शे.फरीना,नर्स नेहा जगदने,चालक वीजय राठोड,नितीन हीवाळे,फार्मशि सुमित लोंखडे हे लसीकरणाचे कार्य पार पाडत आहेत

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत