सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

वझरसरकटे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची शाखा ओपन

मंठा प्रतिनिधी(पप्पू घनवट )तालुक्यातील वाझरसरकटे येथे मनसे मंठा तालुकाध्यक्ष गणेश बोराडे यांच्या हस्ते   धुमधडाक्यात रॅली काढून मनसेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, योगेश खंदारे, दिपक देवकर, आदित्य केंधळे, प्रविण केधळे, ज्ञानेश्वर जाधव,शाम केंधळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वझर सरकटे शाखा कार्यकारिणी खालील प्रमाणे                 शाखा अध्यक्ष - ॠषिकेश सरकटे,उपाध्यक्ष - गोपाल सरकटे, कार्याध्यक्ष - पवन‌ सरकटे, सरचिटणीस - धनंजय सरकटे, सचिव - रवि सरकटे, सदस्य : - रवि सरकटे,पंढरी सरकटे, दत्ता सरकटे,डिगांबर सरकटे, गणेश सरकटे, ज्ञानेश्वर सरकटे,ओम सरकटे, सुदर्शन सरकटे, सोपान सरकटे,सुरज सरकटे,पंकज सरकटे, अमोल नागरे, सचिन खंडागळे, अविनाश सरकटे, दत्ता सरकटे, संतोष सरकटे, धनंजय सरकटे, योगेश सरकटे, कैलास डोंगरे,तन्मय सरकटे, अमोल सरकटे, अभिषेक पोपळघट.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत