न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

संत रविदास नगर परतूर येथे सिमेंट काँक्रेट रस्त्याचे उद्घाटन


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
 परतूर शहरातील संत रविदास नगर येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे  यांच्या कडून विशेषनिधी द्वारेमंजूर करून आणलेल्या  सिमेंट रस्त्याचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोबत उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड तालुकाप्रमुख अशोकराव आघाव शहर प्रमुख विदूर जईद शिवसेना युवा नेते महेश नळगे सुदर्शन सोळंके,बाळू गाते, संदीप पाचारे, दिपक हिवाळे, विकास खरात, संदीप शिंदे ,सुरेश पाटील, रामा घाडगे ,सुंरूग पाटील, बाजीराव गोरे, परमेश्वर पाचारे, व्यंकटेश सरकटे, अशोक गांगुर्डे, बालाजी कांबळे, कैलास सर्जे, शिंदे संतोष, व कॉलनीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
       सदरील रस्त्याचे काम मोहन अग्रवाल यांनी मा.नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष निधी द्वारे मंजूर करून आणल्याचे सांगितले 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत