न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून परतूर विधानसभा मतदार संघासाठी मोठ्या ग्रामपंचायती साठी निधी उपलब्ध=युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची माहिती

प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नाने परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये जनसुविधा निधी अंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीसाठी चा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे 
या प्रसिद्धिपत्रकात राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून आम्ही सदैव मतदार संघाच्या विकासासाठी तत्पर असून विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून देत विकास साधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे
 पुढे या पत्रकात म्हटले आहे की जनसुविधा निधी अंतर्गत मोठया ग्रामपंचायतीसाठी दिला जाणारा निधी यामध्ये मतदार संघातील शेवली नेर तळणी व सातोना खुर्द या ग्रामपंचायतीसाठी 40 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचे राहुल लोणीकर यांनी नमूद केले आहे
पुढे या पत्रकात युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे की गेल्या सात वर्षांमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून परतूर मंठा विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली असून यापुढेही विकासाच्या मुद्द्यावर आपण कधी मागे सरकणार नसल्याचे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे 
लवकरच या कामांना सुरुवात होणार असून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सदरील कामाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी दिली आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत