सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मा. मंत्री आ. लोणीकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

तळणी (रवि पाटील ) परतूर मंठा विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी पाणी पूरवठा मंञी तथा आमदार बबनराव लोणीकर याच्या वाढदी व साच्या औचित्य साधून तळणी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
        यामध्ये तळणी येथील युवा उद्योजक भाजपा कार्यकर्ते शरद पाटील याच्या वतीने श्री संत नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गरजू२० विद्यार्थ्याना वारकरी पोषाखाचे वाटप करण्यात आले तर भाजपाचे जेष्ठ नेते माजी ता अध्यक्ष गजानन देशमुख दारासिंग चव्हाण जि प सदस्य शिवदास हानवते व भाजपा युवा मोर्चाच्या यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर व नेञ तपासणी शिबीराचे आयोजन . करण्यात आले होते या रक्त दान शिबीरामध्ये एकुण ५१ रक्त दात्यानी सहभाग नोंदवीला तर अनेकांनी नेञ तपासणी केली या नेञ तपासणी शिबीराचे आयोजन ह भ प भगवान सरकटे यांच्या पूढाकाराने करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शरद पाटील नितीन सरकटे किशोर हानवते शिवदास हानवते शरद सरकटे भगवान देशमुख रामू सरकटे रामकीसन बोडखे गोविंदराव देशमुख दत्तराव कांगणे राजू खंदारे शरद अप्पा खंदारे अबासाहेब सरकटे रामेश्वर देशमुख बांबाराव मामा गुन्ड सोपानराव पाटील आदी भाजपा कार्यकर्त्यनी या कार्यक्रमासाठी पूढाकार घेतला

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत