मनसे विद्यार्थी सेनेकडुन' भोंग्याच्या आवाजावर हनुमान चालीसा
मंठा प्रतिनीधी सुभाष वायळ
तालुक्यातील मौजे जयपुर काकडे येथे मनसे संस्थापक अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतीसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचे सिध्देश्वर काकडे यांनी जयपुर काकडे येथील हनुमान मंदिर व श्री.राम मंदिर परिसरात भोंगे लाऊन हनुमान चालीसा पठण केली व दररोज सायंकाळी व सकाळी हनुमान चालीसा भोंग्याच्या आवाजावर वाजवत राहिल आसी माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यासह देशभरातील हिंदु बांधवांकडुन राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतीसाद मिळत आसल्याने हि आनंदाची बाब आसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. हनुमान चालीसामुळे हिंदु धर्मीय सामाजिक कार्यात एकवटतो व तसेच यामुळे हिंदु धर्माच्या नियमांचं पालन देखील होत आहे. व समाजात भक्तीभावाचं वातावरण निर्माण होत आसल्याने जालना जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक गावा गावात हनुमान चालीसा दररोज पठण करायला हवी आहे. आसे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. (फोटो सह बातमी)