सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विकास कोरडे यांची नायब तहसीलदार बीड पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करताना प्रकाश सोनसळे (धनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य व सहकारी )

बीड प्रतिनिधी हनुमंत दंवडे

 आज बीड येथे मा. विकास कोरडे साहेब यांची बीड तालुका नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला‌.
यावेळी प्रकाश भैय्या सोनसळे धनगर समाज नेते महाराष्ट्र, डॉ.संतोष महानोर, नारायण भोंडवे, शीतल मतकर, पवन गावडे, प्रजित भोंडवे, बाळासाहेब गावडे, राहुल ठेंगल, विजय घोंगडे, महादेव सातपुते ,श्याम गाडेकर,काशीद मामा, सखाराम गोरे, विशाल प्रभाळे, मयुर खोमणे, योगेश केसकर , कृष्णा पितळे सरपंच, अविनाश बारणे,सुरेश देवडे, नारायण धापसे, महादेव हजारे, ग्रामसेवक ,ज्ञानेश्वर देवकते पोलीस, उपनिरीक्षक, कोकाटे सूर्यकांत , साईनाथ गावडे, सुधाकर वैद्य,शिवराम शिरगिरे, खांडेकर भैय्या ,परमेश्वर तागड, वैद्य सर,गुरव भैय्या, आजीनाथ भोंडवे,रूषीकेश भोंडवे, भाऊसाहेब भोंडवे, विश्वजीत ससाने ,अमर भोंडवे,आदींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत