सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार थकलेलं भविष्य निर्वाह निधी.....एमआयएमच्या पाठपुराव्याला यश.....



परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे
राज्य सरकार व केंद्र सरकारच्या जवळपास सर्वच कर्मचारी वर्गाला भविष्य निर्वाह निधी मिळत असतो परंतु मागील अनेक वर्षांपासून परतूर पालिकेच्या कंत्राटी कामगार यांना भविष्यनिर्वाह निधी मिळाला नव्हता ही बाब एमआयएमचे शहराध्यक्ष सय्यद वसीम यांच्या निदर्शनास येताच 
          त्यांनी याबाबत अथक प्रयत्न करून पाठपुरावा केला आणि परतूर नगर पालिकेने कामगारांसाठी असलेले निधी भविष्यनिर्वाह निधीत न भरलेल्याने पालिकेतील कंत्राटी कामगार यांना भविष्यनिर्वाह निधीचा लाभ घेता आला नव्हता याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून कंत्राटी कामगार यांना भविष्यनिर्वाह निधी बाबतची असलेली अडचण दूर केल्याबद्दल पालिकेतील कामगार यांनी एमआयएमचे शहराध्यक्ष सय्यद वसीम यांचा सत्कार करून धन्यवाद व्यक्त केले...

 यावेळी उपस्थित होते. एडवोकेट सुरेश काळे
शेषेराव चव्‍हाण. दशरथ हीवाले .नामदेव चव्हाण .रमेश चांदलिया.सय्यद जावेद .अशोक हिवाळे .वाघमारे अशा मती .लक्ष्मण हिवाळे . गर्भिया काळे .बेबे कले .भागूबाई काळे .

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत