सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर येथे अहिल्याबाई होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन


परतूर प्रतिनिधी हनुमंत दंवडे
परतूर शहरात अहिल्याबाई होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त .व्याख्याते श्री. गोविंद गोचडे यांच्या व्याख्यानमालेचा कार्यक्रम दिनांक 3/6/2022 वार शुक्रवार रोजी ठीक 7:00 वा. अहिल्याबाई होळकर सांस्कृतिक सभागृह परतूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या व्याख्यानमालेला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आमदार बबनरावजी लोणीकर साहेब पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया माजी आमदार परतुर ,
राहुल लोणीकर प्रदेश महामंत्री, कपिल आकात राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष जालना, माधवराव मामा कदम, शिवसेना अशोकराव शिवसेना तालुकाप्रमुख परतुर, उपजिल्हाप्रमुख जालना, महेश नळगे शिवसेना नेते,रंगनाथ येवले पंचायत समिती सभापती परतूर ,रामप्रसाद थोरात उपसभापती पंचायत समिती परतुर ,इंद्रजीत बापू घनवट जिल्हा परिषद सदस्य जालना, पांडुरंगजी नवल मराठा सेवा संघ परतुर ,बाबुरावजी हिवाळे नगरसेवक परतुर ,एडवोकेट महेंद्रकुमार वेंडेकर, एकनाथराव कदम संचालक आनंद इंग्लिश स्कूल परतूर, बाबुराव गोसावी वंचित बहुजन आघाडी ता. अध्यक्ष परतूर , आनवर देशमुख नितीन कुमार जेथलीया बाबासाहेब तेलगड उपजिल्हा प्रमुख शिवसेना ,रमेशराव सोळंके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, बापूराव आढाव,सामाजिक कार्यकर्ते, बाबासाहेब गाडगे काँग्रेस तालुकाध्यक्ष परतुर, रमेशराव भापकर, भाजपा तालुकाध्यक्ष परतुर, शत्रुघ्न कणसे भाजप युवा तालुकाध्यक्ष परतुर, टकले भाजपा युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष जालना, शिवाजी बलमखाणे, भाजप नेते, कृष्णा आरगडे नगरसेवक,संतोष साबळे शिक्षणाधिकारी परतुर, स्वागत अध्यक्ष
 हारेरामजी माने जिल्हा परिषद सदस्य जालना, शिवाजीराव भालेकर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष जालना, हे असतील व
संयोजक कमिटी म्हणून नामदेव गोरे अध्यक्ष अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समिती, दत्ता कोल्हे उपाध्यक्ष अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समिती परतूर, हनुमंत द वंडेसचिव अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समिती परतुर, विलास रोकडे कृष्णा गायकवाड शिवाजी गोरे, विलास तरवटे,शिवाजी तरवटे ,योगेश घोंगडे ,पांडुरंग मुळे ,योगेश मुळे, दत्ता गोरे ,दादाराव बकाल, संयोजक कमिटी म्हणून उपस्थित असणार आहेत.तसेच परतूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान अहिल्याबाई होळकर उत्सव समिती परतूर च्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत