सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

नदीवर तात्काळ पुल बांधा' अन्यथा पाण्यात आंदोलन




सिंदखेडराजा प्रतीनीधी समधान खरात
सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव नदीवर पुल नसल्यामुळे गावकर्यांना पावसाळ्यात जीव मुठीत धरुन वाट काढावी लागते आहे. याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राधेशाम बंगाळे यांनी केला आहे.     जोराचा पाऊस आल्यावर रस्त्यासाठी नागरिकांची तारांबळ ऊडत आसुन बुलढाणा जिल्हा परीषद च्या बांधकाम विभागाने लक्ष घालणं गरजेचं आसल्याचे मनसेचे राधेश्याम बंगाळे यांनी म्हंटले आहे. लोकप्रतिनिधी तसेच बांधकाम विभागाने दुर्लक्ष करता कामा नये. तात्काळ हा पुल बांधावा नसता पाण्यात ऊतरुनच आंदोलन करु आसा ईशारा राधेश्याम बंगाळे यांनी दिला आहे. पुल मंजुर झाला आहे का? किंवा या पुलाचे पैसे अधिकारी व गुत्तेदारांनी तर ऊचलन खाल्ले नाही ना? आसा सवालहि बंगाळे यांनी केला आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत