सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

निखिल रामराव साबळेयांचा पीएच.डी.पदवी प्राप्त केल्या बद्दल सत्कार .



परतूर प्रतीनीधी हनमंत दंवडे
येथील निखिल रामराव साबळे यांनी पदार्थ विज्ञान शास्त्र या विद्या शाखेत नुकतिच शिक्षण क्षेत्रातील पीएच. डी.ही सर्वोच्च पदवी संपादन केली.
        त्यांच्या या यशाबद्दल श्री पतंजली आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव बरकुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
         निखिल साबळे यांनी " अ स्टडी ऑफ क्रिस्टलाईन सॉलीड मटेरियल अॅण्ड इट्स ऍप्लीकेशन्स "
या विषयात डाॅ.किशोर गोपाळराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मलवांचल युनिव्हर्सिटी इंदोर येथे संशोधन प्रबंध सादर केला होता. निखिल साबळे यांना या संशोधन कार्याबद्दल पीएच.डी.ही पदवी विद्यापीठाने बहाल केली.
    निखिल साबळे  
यांचे पीएच.डी.पदवी प्राप्त केल्यासर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत