सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रल्हादराव बोराडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट..



(
मंठा प्रतीनिधी सुभाष वायाळ
 दि.२० मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंठा शहरातील सुपरहिट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शिवसेनेच्या नगरसेविका सरोजाताई प्रल्हादराव बोराडे यांचे पती यांनी मुंबई येथे जाऊन महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मंठा शहर तालुका विकासमय आणि सुजलाम सुफलाम करण्यासाठी भरीव निधीची मागणी केली असून मंठा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याकडेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यावे म्हणून प्रल्हादराव बोराडे यांनी त्यांची भेट घेऊन साहेब, मंठा शहरा तालुक्याकडे आपले लक्ष असू द्या अशी विनंती केली.
(मंडळ शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणून शहराचा विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या माध्यमातून शहराचा विकास करणार प्रल्हादराव बोराडे असा विश्वास व्यक्त केला.
(आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बबनरावजी लोणीकर यांच्या माध्यमातून शहराचा विकास करणार- प्रल्हाद बोराडे)

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत