अमित ठाकरे यांचा मराठवाड़ा दौरा - सिद्धेश्वर काकडे
मराठवाडा: प्रतिनिधी समाधान खरात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष राजपूत्र श्री.अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातामध्ये घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह विद्यार्थी सेनेची मोठी चळवळ उभा राहतांना दिसून येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत शेवटच्या घटकापर्यंत जाऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याला जोडून महाराष्ट्रातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना मजबूत करतांना दिसत असल्याने याचा खूप मोठा आनंद असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. दिनांक १६ जुलैपासुन त्यांचा मराठवाडा दौरा चालु होणार आसुन अमित साहेब ठाकरे हे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन विद्यार्थी व तरुणांशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत अशी माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी दिली आहे.