माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली,वरफळ विविध सेवा सहकारी संस्थेवर भाजपचा झेंडा

*

परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
तालुक्यातील वरफळ येथील वरफळ विविध सेवा सहकारी संस्थेवर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व भाजप युवा मोर्चा चे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  अटीतटीच्या लढतीत दणदणीत विजय मिळवत भारतीय जनता पक्षाचा झेंडा विविध सेवा सहकारी संस्थेवर फडकवला.
यात चेअरमन पदी सतिष माणिकराव कुलकर्णी तर व्हाईस चेअरमन पदी हयात खान दाऊद खान यांनी बाजी मारली
यावेळी राहुल लोणीकर यांनी सांगितले की सहकार क्षेत्राला भरारी देण्यासाठी सहकारी संस्थाच्या माध्यमातून गावगाड्यातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात उलेखनीय कार्य करणार आहोत तसेच वरफळ येथील शेतकरी यांनी भारतीय जनता पक्षांवर दाखवलेल्या विश्वासा बद्दल ही श्री राहुल लोणीकर यांनी आभार मानले
यावेळी राहुल लोणीकर, नवनिर्वाचित चेअरमन सतिष कुलकर्णी, व्हाईस चेअरमन हयात खान पठाण,रामकीसन रुपनर,गुलाब सावंत,सुधाकर बेरगुडे उद्धव गोरे,सरपंच नदीम पटेल,अश्रोबा गोरे,गजानन गोरे,रंजित बेरगुडे, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार