अरुण धुमाळ यांच्या मोहन अग्रवाल यांच्या उपस्थीत शिंदे गटात प्रवेश
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
आज मोहन अग्रवाल यांच्या निवासस्थानी परतुर तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण धुमाळ यांचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या गटात मोहन अग्रवाल व मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला अरुण धुमाळ हे शेवगा येथील ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक असून गेल्या 37 वर्षापासून परतूर तालुक्यात शिवसेनेचे काम करीत आहे त्यांनी स्वर्गीय नाशिकराव मुळे व स्वर्गीय सुधाकररावजी खवणे यांच्यासोबत शिवसेना वाढविण्यासाठी काम केले आहे यांच्या सोबत येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास वटाणे व युवासेनेचे मंगेश वाटाणे यांनीही मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गाटात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी वलखेडचे उपसरपंच भगवान सुरूंग उपशहर प्रमुख सतीश हजारे बाबासाहेब चिखले दत्ता अंभुरे यांची उपस्थिती होती
Comments
Post a Comment