सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

रिपब्लिकन सेनेच्या परतुर तालुकाध्यक्षपदी निर्मला वाघमारे यांची नियुक्ती...


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
रिपब्लिकन सेना संपर्क कार्यालय जालना येथे परतूर तालुक्यातील महिला निर्मला संतोष वाघमारे यांची परतूर महिला तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आल        यावेळेस निवडीबद्दल बोलतांना निर्मला वाघमारे म्हनाल्या की, पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार संघटन वाढवण्याचं काम करणार असून सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन महिला सक्षमीकरण्यासाठी प्रयत्न करणार व आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ राहण्याचे त्यांनी वचन दिले, यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष दिनेश भाई आदमाने यांच्या अध्यक्षतेखाली निर्मला वाघमारे यांची निवड करण्यात आली .या वेळेस तिथे पश्चिम जिल्हा अध्यक्ष लिंबाजी बाबळकर, पूर्व जिल्हा अध्यक्ष, दिनेश भाई आदमाने जिल्हा उपाध्यक्ष ,सर्जेराव अंभोरे बदनापुर तालुका अध्यक्ष ,दासु गरबडे परतुर तालुका अध्यक्ष, जयपाल भालके,परतूर युवक तालुकाध्यक्ष कैलास भालके ज्येष्ठ नेते दादारावजी दवंडे,रामभाऊ पाईकराव संतोष वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते निर्मला वाघमारे यांच्यासोबत होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत