भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्व. अनिल जिंदल परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर जालना येथे उत्साहात साजरा
जालना सुभाष वायाळ
दि.१८माय नेशन माय प्राइड आज़ादी का महोत्स्तव लायंस क्लब ऑफ़ जालना डायमंड डिस्ट्रिक्ट ३२३४ एच-२ तर्फे नगर परिषद शाळा संभाजी नगर,जालना येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सपन्न झाला.
. .यावेळी राष्ट्रगीताची सुरुवात करुन विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर केले.तसेच लायंस क्लब ऑफ़ जालना डायमंड तर्फे निबंध , वकृत्व , चित्रकला , रांगोळी , वादविवाद , नृत्य घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वाटप करण्यात आले , क्लब तर्फे शाळेला कंप्यूटर संच वितरण करण्यात आले व मुलांना बिस्किटे पैकेट चे वितरण केले. यावेळी क्लब चे झोन चेयर पर्सन लॉ मीनाक्षी दाड , लॉ विजय दाड , अध्यक्ष लॉ दिनेश राम सिनगारे , सेक्रेटरी लॉ संजय पित्ती , योगेश सोनुने , दिपक चरखा , सुभाष फत्तेलष्कर संतोष भालेराव बाबासाहेब खिल्लारे गजानन गायकवाड राजू ढाकणे समद मणियार विलास जगधने जयेश मेहता शिवरतन डवले श्रीमती सुनंदा वैष्णव श्रीमती कांचन काळे श्रीमती माधुरी भालेराव सौ.कल्याणी महालकर शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुंडलिक उपस्थित होते.