सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर बैल पोळा उत्साहात साजरा


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
     शहरात सह ग्रामीण भागातही बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांनी बैलाची सजावट करत ढोल ताशा सोबत मिरवणूक काढली होती.
    दरम्यान,शहरातील गाव भागात सायंकाळी चार वाजता येथील मारोती मंदिराजवळ बैलाची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी जेष्ठ नागरिक शंकरराव पवार राजेभाऊ पवार,मा.नगरसेवक गणेशराव पवार,अशोकराव उबाळे,द या काटे,जगन्नाथ बागल,शिवा बल्लमखाने, अनिल देशपांडे,लिबाजी गाडेकर,गणेशराव मुजमुले,प्रल्हाद उबाळे,विनोद बागल, संजय कानपुडे,सुनील बागल,पांडुरंग कानपुडे,प्रश्नात पुरी,मकरंद लिबुळकर,समीर देशपांडे,रामकांत बरीदे,लक्ष्मीकांत माने,
राजेश पवार,सुधाकर गिरी,मुकुंद खरात,अजय खरात,विलास गायकवाड,रमेश गवळी, ज्ञानेश्वर माने, बाबासाहेब माने, ओंकार माने, अशोक कानपुडे, तानाजी उबाळे, हरिभाऊ उबाळे, दीपक उबाळे, शाम बागल, नंदलाल कपाळे, प्रभाकर बागल, गंगाधर पवार, शंकर उबाळे,पांडुरंग कानपुडे, शिवाजी पुरी, दीपक पुरी, किरण puriओमप्रकाश पुरी, तुकाराम उबाळे, दीपक बरीदे, शिवलिंग राऊत, योगेश काटे, चंद्रकांत कपाळे, सतीश गुजर, रुपेश गुजर, सुभाष बरीदे,चंद्रकांत बल्लमखाने, सुनील ठोंबरे सह पत्रकार योगेश आदीं बरीदे आदीची यावेळी उपस्थिती होती. दरम्यान,यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन गुट्टेवार,संजय वैद्य यांनी चौख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

गेल्या अनेक वर्षे पासून शहरात बैल-पोळा सण उत्साहात साजरा करण्यात येतो.ही परंपरा शेकडो वर्षे पासून चालत आलेली आहे.गेल्या दोन वर्षे कोरोना असल्याने बैल-पोळा सण साध्या पध्दतीने साजरी करण्यात आला होता यंदा मात्र उत्साहात बैल पोळा सण साजरा करण्यात आला.
गणेशराव पवार,माजी नगरसेवक, परतूर

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत