सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

राशन कार्ड साठी सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने तहसीलदार यांना निवेदन सादर...


परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
परतुर येथील तहसील कार्यालयामध्ये अनेक सर्वसामान्य लोक राशन कार्ड साठी येत असतात अनेक वर्षापासून फाईल प्रलंबित आहेत राशन कार्ड साठी ये जा करून सर्वसामान्य लोकांचा जीव मेटकुटीलाआलेला आहे. 
       नायब तहसीलदार पुरवठा विभाग यांच्याकडे याचे काम आहे यांच्याकडे अनेक लोक राशन कार्ड च्या तक्रारी घेऊन येतात त्या तक्रारीचे योग्य दिशेने निराकरण होत नाही त्यासंदर्भात विचारणा केली असता हे सांगतात की आमच्याकडे याचा अतिरिक्त पदभार दिलेला नाही अशी उडवा उडवी चे उत्तर नायब तहसीलदार नेहमी लोकांना देत असतात. एजंटच्या माध्यमातून राशन कार्ड देण्याचे काम तहसील विभागांमध्ये सुरू आहे हे एजंट कोण आहेत. यांच्याकडे कोणता पदभार आहे .या सर्व प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे बेजबाबदार नायब तहसीलदार  यांना कार्यमुक्त करण्याची मागणी सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांनी केली आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत