सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला यश*......!*पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेक्षणातून वंचित लाभार्थ्याचे होणार पुन्हा सर्वेक्षण,जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे पाटील यांची माहिती

*

परतूर/प्रतिनिधी: हनुमंत दवंडे 
पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंब धारकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या अनुषंगाने सन 2018-19 मध्ये ऑनलाइन पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले होते 
     यातील बहुतांश कुटुंबाची नावे आवास प्लस च्या चुकीच्या सिस्टम मुळे वगळण्यात आले होती व अनेक कुटुंबधारक सर्वेक्षणापासून वंचित राहिले असल्याने या बाबत सरपंच परिषदेच्या वतीने वेळोवेळी मा.उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण मुख्यकार्यालय,जिल्हा प्रकल्प संचालक व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला 
तद्नंतर मा.उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकरी मुख्याधिकारी यांना पत्र देऊन सर्वेक्षण केलेली पण सिस्टम च्या तांत्रिक अडचणीमुळे अपात्र झालेली व सद्या पात्र असलेली तसेच आवास प्लस अंतर्गत प्र पत्र ड मध्ये सर्वेक्षण न झालेली पंरतु सद्या पात्र असलेल्या सर्व कुटुंबाची माहिती मागवण्यात आली असून त्यामुळे जिल्ह्यातील हजारो पात्र कुटुंब पात्र होऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे पाटील यांनी दिली.
पुढे बोलतांना श्री कणसे यांनी सांगितले की ज्या कुटुंब धारकांचा सर्वेक्षना पासून वंचित राहिले आहेत अश्या कुटुंब धारकांचे सुद्धा आता सर्वेक्षण होणार असून याबाबत जिल्हा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना पत्र व्यवहार केला असल्याची माहिती ही श्री कणसे यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण भागातील नागरिकांनी प्र पत्र ड, पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेक्षणातुन अपात्र ठरलेल्या व ज्या कुटुंबंधारकांचे सर्वेक्षण झालेले नाही अश्या कुटुंब धारकांनी सर्वेक्षण करून घेण्याचे आवाहन ही श्री कणसे यांनी केले.
 तत्काळ या सर्वेक्षणाला प्रशासकीय स्तरावर सुरुवात होणार आहे याबाबत गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक व अन्य सामाजिक कार्यकर्ते यांनी लक्ष देऊन गावातील एकही कुटूंब सर्वेक्षणातून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याची आवाहन ही सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आले 
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ आप आपल्या गावातील कुटुंबांना मिळावा यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून सर्वच सरपंच यांनी वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्रकल्प संचालक यांना भेटून मागण्या मांडण्यात आल्या होत्या


*चौकट*

==================
सरपंच परिषद जालना यांनी दिलेल्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर व मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहुल लोणीकर सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र राजे भोसले, व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली वायाळ तसेच जिल्ह्यातील सर्वच सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले.... सर्वांच्या सहकार्यातून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची सरपंच परिषद जालना दक्षता घेईल 
- *शत्रुघ्न कणसे पाटील* 
( *जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद जालना* )
==================

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड