इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशनच्या मंठा तालुका अध्यक्ष पदी शेख आशपाक यांची निवड ,पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर-शेख अशपाक



मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
     इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या निर्देशानुसार व मराठवाडा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या सहमतीने जालना जिल्हा अध्यक्ष शेख उमर (बबलू भाई) यांनी मंठा येथील पत्रकार दैनिक लोकसंपर्कचे तालुका प्रतिनिधी शेख अशपाक यांची मंठा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. शेख अशपाक यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना जोडून पत्रकारांचे रक्षण करण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.
शेख अशपाक यांनी सांगितले की पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर आहे.
शेख अशपाक यांना जिल्हा अध्यक्ष शेख उमर (बबलू भाई) आणि जिल्हा महासचिव प्रेम जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
शेख अशपाक यांची मंठा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल असलम कुरेशी (प्रदेश अध्यक्ष मराठवाडा महाराष्ट्र), व्यंकटेश सूर्यवंशी (प्रदेश महासचिव मराठवाडा), देवेंद्र योगेन्द्र भोंडे (इम्पैक्ट 24 न्यूज), जावेद पठाण (प्रदेश कोषाध्यक्ष मराठवाडा), शेख नबी सिपोराकर (मराठवाडा उपाध्यक्ष), मोहम्मद उमर बबलू (जिल्हा अध्यक्ष जालना), संतोष (प्रेम)जाधव ( जालना जिल्हा महासचिव) शबाब बागवान (जगमित्र), हाफिज खान, पञकार बालासाहेब खराबे, पञकार सुभाष वायाळ सर, पञकार अशीश मोरे, पञकार अकबर पठाण, पञकार सय्यद रफिक आदी पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत