सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

चमन चा राजा या गणेश मंडळांनी सादर केला बाबा अमरनाथ यांचा देखावा

जालना प्रतिनीधी समाधान खरात 
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व सणासुद शांततेत साजरी करण्यात आले होते परंतु यावर्षी महाराष्ट्र सरकारने सर्व सणासुदीवर कुठलेही निर्बंध न ठेवता सर्व सण जोरात साजरी करण्याच्या निर्णयामुळे यंदा गणपती उत्सव सर्व कडे जोरात साजरा करताना दिसत आहे
        जालना येथील चमन चा राजा गणेश मंडळ दरवर्षीच नेहमीच विविध देखावे सादर करीत असते यावर्षी अमरनाथ यांचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आला हा बघण्याकरिता नागरिकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहेत 
      चमनचा राजा या गणेश मंडळाला शहरातील  प्रतिष्ठित नागरिक हे भेट देत आहेत यामध्ये उद्योजक अरुण लाहोटी व दैनिक आनंद नगरीचे संपादक रवींद्र बांगड यांनी संपत्नी कुटुंबासह भेट दिली असता त्यांचा  बाबा अमरनाथ यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आले होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जावळे उपाध्यक्ष राम पाटील खांडे , डॉक्टर प्रवीण जाधव,सचिव अशोक पडूळ ,कोषाध्यक्ष प्रशांत मस्के ,मंगेश देशमुख, विक्रम आगलावे, निरंजन राग ,बाळू वानखेडे, दादा गाडे ,अतुल ढवळे उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत