सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विषबाधा प्रकरणी कठोर कार्यवाही करा:- श्री राम हिंदु जनजागृती संघाची मागणी


मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
               मंठा व परतूर तालुक्यात नवरात्र उत्सवा निमित्त भगरीच्या भातामधुन भाविक भक्तांना विष बाधा झाल्याने मंठा व परतूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच श्री.राम हिंदु जनजागृती संघ अध्यक्ष तथा मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी या प्रकरणाची दखल घेत जालना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार पाठवली आसून या संदर्भात विषबाधा प्रकरणी हिंदु धर्माच्या नवरात्र उत्सवातच भगरी मधून विषबाधा का? या मागचा हेतू तपासून सबंधित लोकांवर कठोर कार्यवाही करावी आशि मागणी श्री. राम हिंदु जनजागृती संघ अध्यक्ष तथा मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केली आहे.
       नवरात्र उत्सव हा उत्सव आनंदाने साजरा करायचा तर? विषबाधाचा प्रकार का घडला आहे. या बाबीची पोलीस प्रशासनाने कठोर कार्यवाही केली पाहिजे. व भगर निर्मित कंपनीवर कारवाई करण्यात आली पाहिजे आशि मागणी सिद्धेश्वर काकडे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत