सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

हस्तिनापूर नवरात्र महोत्सवाची कार्यकारणी ,अध्यक्षपदी अविनाश कुलकर्णी, उपाध्यक्षपदी सत्यम ओझा तर सचिव पद्दी गणेश देवक



परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
   येथील हस्तिनापूर नवरात्र महोत्सवाची नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी अध्यक्षपदी अविनाश कुलकर्णी , उपाध्यक्षपदी सत्यम ओझा तर सचिव पदी गणेश देवक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
       मागील दोन वर्ष कोरोना काळात गेल्यामुळे नवरात्र महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला नसल्याने यावेळी नवरात्र महोत्सव अति उत्सवात साजरा करण्यात येणार आहे. परतूर येथील हस्तिनापूर नवरात्र महोत्सव अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येतो. उर्वरित कार्यकारणी कोषाध्यक्षपदी सागर झंवर, कार्याध्यक्ष पदी गणेश सुरसुरवाले,  सदस्यपदी सचिन नंदीकोल्हे, प्रफुल पवार, श्रीराम मुंदडा, आराध्य ओझा, भारत जोशी, कृष्णा मारोठे, अशोक राजपरोहित, आदित्य अंभुरे, अनमोल अग्रवाल, गणेश माकोडे, सल्लागार प्रदीप लढा, मोहन अग्रवाल, जगदीश झंवर, राजू आण्णा सुरसुरवाले, प्रवीण मारोठे, शाम ओझा, रोहित अग्रवाल, मनोहर कुंटुर, राधेश्याम तापडिया, सागर काजळे, रोहित अग्रवाल, सुदर्शन पांगारकर, गोविंद बजाज, संजय मोर, गजानन चोरघडे, विकास अग्रवाल ( बबलू) प्रवीण कुलकर्णी, विकास पवार, अक्षय ओझा .

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत