दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची नियुक्ती

Image
जालना | प्रतिनिधी समाधान खरात  दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय दिगंबरराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली. नियुक्तीपत्रानुसार, विजय जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दलित, वंचित, पीडित व अन्यायग्रस्त समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या विचारांनुसार कार्य करावे, अशी अपेक्षा संस्थापक-अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. दलित महासंघ ही महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक संघटना असून, समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहे. यावेळी विजय जाधव यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी शुभेच्छा देत त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.

शंभर रुपयात लाभार्थ्यांना शिधा किट वाटपपरतूर: लाभार्थ्यांनमध्ये समाधान



परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
        राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत तालुक्यातील शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना दिवाळी सना निमित्त शंभर रुपयात चार वास्तुनचा एक सच याप्रमाणे आनंदाची शिधा किट प्रत्यक राशन दुकानदाराकडून वितरण करण्यात येत आहे.सर्व सामन्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी यासाठी राज्य शासनाने शंभर रुपयात रवा,चांनाडाळ,एक लिटर तेल निर्णय घेण्याचा निर्णय घेतला होता.यात परतूर तालुक्यातील स्वस्थ धान्य दुकानदाराने कडून आनंदाच्या शिधा चे वाटप सुरू करण्यात आले आहे. 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तहसिल कार्यालय अंतर्गत 122 रास्त भाव दुकानदारा मार्फत सदर शिधापत्रिका सच लाभार्थी वितरण करण्यात येत आहे.याचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावी 
प्रकाश जाधव,पुरवठा निरीक्षक परतूर 

वाढती महागाई यामुळे सना वर संकट उभे राहते शासनाने शंभर रुपयात शिधा किट दिल्याने समाधान मिळाले आहे.
ऋषिकेश खरात, लाभार्थी, परतुर


दिवाळी निमित्ताने नागरिकांन साठी राज्य शासनाने कडून शिधा किट चे वितरण करण्यात येथे आहे.ऑनलाईन प्रणाली चालत नसल्याने ऑफलाईन पध्दतीने शिधा किट वाटप करण्यात येत आहे.
द.या.काटे,रास्त धन्य दुकानदार




Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत