सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सुनील स्वामी विभूते यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
        परतूर येथील रहिवाशी व आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले सुनील स्वामी विभूते यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 
      आष्टी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर ते मागील दहा वर्षांपासून कार्यरत होते. त्यांनी 35 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम केले. सतोना, परतूर आष्टी अश्या विविध ठिकाणी त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले दि 04 पार पडलेल्या कार्यकमात सुनील स्वामी विभूते त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळीओम स्वामी, महारुद्र स्वामी ,जितेंद्र स्वामी ,सिद्धलिंग स्वामी ,शिवकुमार स्वामी, अमरनाथ स्वामी ,उमाशंकर स्वामी ,शिवशंकर स्वामी ,महालिंग स्वामी, शांतलिंग स्वामी ,अक्षय स्वामी ,आकाश स्वामी ,अनिकेत स्वामी ,डॉ शेषेराव वायाळ,प्रल्हाद माने, अशोक माने, रामा माने, रमाकांत बरीदे आदी उपस्थित होते. फोटो ओळी- सेवा निवृत्त झाल्या बद्दल सुनील स्वामी विभुते यांचा सत्कार करताना स्वामी परिवार.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत