सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

भवीष्यात आजून चांगल्या पद्धतीने सामने घेऊ -महेश नळगे

 परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
शिवसेना जेष्ठ नेते रामेश्वर  नळगे यांच्या वाढदिवसानिमित्त परतूर येथे  शारजा मैदानावर लीग पद्धतीचे टेनिस बॉल क्रिकेट चे सामने आयोजित करण्यात आले 
होते
    या प्रमियम लीग सामन्या मधे 8 संघाने भाग घेतला होता या सामन्याच्या 
      अंतिम सामाना एम एच 21 वीरूद्ध शिश ऐलेव्हन मधे खेळवण्यात आला होता हा सामना आटी तटीचा झाला या मधे   एम एच 21  संघाने सामना जिंकला   
      या सामन्या चे पारीतोषक वीतरन शिवसेना उपजिल्हा प्रमुख माधवराव कदम हे अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थीत युवा सेना जिल्हा समन्वयक  महेश नळगे , माजी सभापती आशोक आघाव, उपतालुका प्रमुख कांतराव सोंळके ,बाळू सोनवने होते
  यावेळी बोलताना महेश नळगे यांनी सांगितले की   भविष्यात हि तरूणांनसाठी चांगले पद्धतीने व आधूनीक पद्धतीने सामने शिवसेने तर्फे आयोजित करू   पुढे बोलताने ते म्हणाले की युवकानी या खेळातून सांघीक भावना ही वाढीस लागावी व खेळा सोबत शारीरीक काळजी घ्यावी तसेच युवकांनी व्यसना पासून दूर रहावे 
           यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमसाठी  मोठ्या संखेने खेळाडू,  शिवमुद्रा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शिवसैनिक  उपस्थित होते 
        प्रथम बक्षीस  महेश  नळगे ( युवासेना समन्वयक जालना ) ६११११ रू तर
      द्वितीय बक्षीस श्री धनू  भालेकर ३११११ रू ठेवण्यात आले होते..
 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत