न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

दैठणा खु ग्रामपंचायत राकॉ च्या ताब्यात,सरपंचासह सर्व उमेदवार विजयी

 
    
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दैठना खुर्द ग्रामपंचायत निवडणूकीकडे तालुक्यातील अनेक दिग्गजाचे लक्ष लागले होते. या अटीतटिच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्वच उमेदवारांचा सफाया करीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले आहे. दैठना खुर्द येथे भाजपचे प्रतिष्ठेचे पदाधिकारी असल्याने या ग्रामपंचायतीकडे तालुक्यातील अनेकांचे लक्ष लागले होते. 
        निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र दैठना खुर्द येथे राष्ट्रवादीची मोठी ताकद असल्याने भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीने एका हाती सत्ता मिळविण्यात यश आले. ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत दैठना खुर्द येथे राष्ट्रवादीने एका हाती सत्ता मिळाल्याने युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी विजयी सरपंच सदस्याचा सत्कार करून शुभेछा दिल्या.      


दैठना खुर्द येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पॅनलच्या सर्व सदस्य व नेतृत्वावर विश्वास ठेऊन प्रचंड मतांनी निवडून दिले. गावच्या व ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी नेहमी पुढाकाराची भूमिका घेऊन जनतेचे प्रश्नाची सोडवणूक करील. विश्वास सार्थ ठरेल. 
सुनील सुदाम तायडे, नवनिर्वाचित सरपंच, दैठना खुर्द
 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत