आनंद इंग्लिश स्कूल परतूर मध्ये मोफत कलचाचणी संपन्न


परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
आपल्या देशात डॉक्टर, इंजिनिअर, आयएस,आयपीस, सीए या सारख्या सर्व व्यावसायिक पदवी शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षे द्वारे प्रवेश दिला जातो. आपला कल नेमका कोणत्या शाखेकडे आहे याचा संभ्रम असतो. हा संभ्रम दूर होण्यासाठी विद्यार्थ्यांची कलचाचणी करणे आवश्यक असते. परंतु हि कलचाचणी महाग असल्यामुळे व स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने पालक टाळतात. याचे महत्त्व लक्षात घेता परतूर शहरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंद इंग्लिश स्कूल परतूर ने लिड एज्युकेशन कंपनी च्या सहकार्याने दि.26 फेब्रुवारी रविवार रोजी मोफत घेण्यात आली.
यामध्ये परतूर शहरातील एकूण 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 
        यासाठी परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून मुख्याध्यापिका सत्यशीला तौर- कदम , सह केंद्रप्रमुख म्हणून प्राचार्य नारायण सागुते, मुख्याध्यापक संजय कदम यांनी काम पाहिले. यावेळी निरीक्षक म्हणून लिड एज्युकेशन कंपनी चे व्यवस्थापक स्वप्नील वाटेगावकर उपस्थित होते. 
   परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आनंद इंग्लिश स्कूल, आनंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक, शिक्षिका, व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत