सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर तालूका अध्यक्ष पदी एकनाथ दहीवाळ उपाध्यक्ष मंगेश डहाळे तर सचिव नितीन ओवळे

परतूर ता.10 प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    आज दिनांक 10 2 2023 रोजी परतुर येथील कृष्णमूर्ती हॉटेल येथे सोनार सेवा महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांतजी डहाळे परभणी यांच्या अध्यक्षतेखाली सकल सुवर्णकार समाज परतुर यांची बैठक पार पडली यामध्ये तालुका परतुर सराफा असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये सराफा असोसिएशन अध्यक्ष म्हणून श्री एकनाथराव नारायणराव दहिवाळ उपाध्यक्ष श्री मंगेश जगन्नाथराव डहाळे कार्याध्यक्ष श्री गोविंद दत्तोपंत बोकन कोषाध्यक्ष किरण सोनाजीराव शहाणे तसेच सचिव पदी श्री नितीन पद्माकरराव ओवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली


 या वेळी
   राजेभाऊ ओवळे,चंद्रकांत दहिवाळ, किरण शहाणे,प्रल्हाद कापाळे, दत्ताराव कपाळे, नंदलाल कपाळे, अविनाश शहाणे, महेश दहिवाळ,जगनराव डहाळे, शंकर डहाळे,संतोष दहिवाळ,गजानन डहाळे, प्रदीप शहाणे, कृष्णा चिंचोळकर, राजेभाऊ ओवळे, डॉ. ओवळे, बाबुराव दहिवाळ, अमोल शहाणे, सखाराम कुलकर्णी, विलास शहाणे आदी समाज बांधव उपस्थित होते. फोटो ओळी- परतूर तालुका सोनार महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी एकनाथ दहिवाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना सोनार समाज बांधव दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत