सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

ला.ब. शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयात कळ्या फीती लावून महाराष्ट्र शासनाचा निषेध

 परतुर प्रतिनिधी कैलास चव्हाण
  शासनाने जुनी पेन्शन योजना सुरू करावी व सातव्या वेतन आयोगाचे पैसे त्वरित खात्यात जमा करावे या मागणी करिता आज लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालय परतूर येथे सर्व कर्मचाऱ्यांनी काळे किती लावून निषेध केला व निदर्शने केली
 या प्रसंगी काळ्या फिती लावून निषेध करतांना लाल बहादुर शास्त्री महाविल्यातील सर्व कर्मचारी निर्देशने करताना पाराजी धुमाळ शिवाजी लाटे हानुमान दांगट डॉ केशव बरकुले राजेश काबळे ज्ञानेश्वर चव्हाण भगवान मस्के डॉ कदम संतोष प्रा अमोल काळे डॉ श्रीमंत सुरवसे काळे प्रा खालनापुरे गणेश बानसोड गणेश मोरे भाऊसाहेब पाटिल राम सरकटे गजु खालपुरे आदिसह कर्मचारी प्राध्यापक सहभागी झाले होते

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत