सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

आपत्यकालीन लग्न चिंता नको 37 मुहूर्त....जिल्ह्यातील विविध इच्छुकांची जुळवाजुळव सुरू



सातोना प्रतिनिधी पांडुरंग शिंदे

काही अपत्यकालीन कारण असल्यास अगदी चतुर्मासातही लग्न करता येते. त्यामुळे आता लग्न मुहूर्त निश्चित करण्यासाठी विवाह इच्छुकांची जुळवा जुळव सुरू आहे. यासाठी मंगल कार्यालयाचे लॉन्स केटरिंग ब्रँड पथक घोडा सजावट अशा विविध बाबींनी प्राधान्य देण्यासाठी आधी लग्न मुहूर्त निश्चित केले जात आहेत.
त्यानुसार वधू-वरांच्या कुटुंबाकडून सर्व तयारी केली जात आहे.चतुर्मासात काही लग्न मुहूर्त असल्याने अनेकांची आता लग्नाचा बार ओढण्यासाठी नियोजन केले आहे.

आपत्यकालीन लग्नाचा मुहूर्ता कोणासाठी


चतुर्मासात आपत्तीकालीन विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. ज्यांचे आधीच लग्न ठरले आहे किंवा साखरपुडा झाला आहे घरात कोणी आजारी असेल किंवा या परिस्थितीतील लग्न लावायचे आहे अशांनी आपत्तीकालीन विवाह करावा काही घरगुती अडचण असल्यास आपत्तीकालीन विवाह करावा.


एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 37 आपत्तीकालीन लग्न तिथी

यंदा लग्न तिथी कमी असली तरी अधिक मास चतुर्मास काळातही लग्न करता येणार आहेत त्यासाठी दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहाची वाट पाहावी लागणार नाही एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आपत्तीकालीन 37 लग्न तिथी असल्याचे पंचकर्त्यांनी सांगितले आहे त्यामुळे या लग्नाच्या तिथी सुद्धा अनेक जण नोंदवितात.


गौणकाल आणि आपत्तीकालीन मुहूर्त

एप्रिल १५ २३ २४ २९ ३०

जून 30
जुलै १ २ ४ ५ ९ १० ११ १४

ऑगस्ट २२ २६ २८,२९.
सप्टेंबर ३,६,७,८१७,२४,२६
ऑक्टोंबर १६,२०,२२,२३,२४,२६,
नोव्हेंबर, १,६,१६,१८,२०,२२

अधिक मास 18 जुलै ते 16 ऑगस्ट

चतुर्मास 29 जून ते 23 नोव्हेंबर


मुख्य काळातील लग्न तिथी......
मे,२,३,४,७,९,१०,११,१२,१५,१६,२१,२२,२९,३०,
जून, १,३,७,८,११,१२,१३,,१४,२६,२७,२८,
 डिसेंबर६,७,८,१५,१७,२०,२१,२५,२६,३१,


तयारीची धूम धूम....

विवाहासाठी केवळ मुहूर्तच नाही तर पाहुणे मंडळीची सोय व्हावी यासह धुमधुमक्यात. लग्न करता यावे याचे नियोजन तीन ते चार महिने आधीच केले जात आहे त्यासाठी मनाप्रमाणे आणि वाडीच्या सोयीनुसार मंगल कार्यालय लॉन्स हॉल याची व त्यासाठी लागणाऱ्या केटरिंग सह विविध यंत्रणेची जुळवा जुळवा केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत