न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

पाटोदा येथे समर्थ विद्यालयात प्रेरणा सत्र संपन्न.

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
पाटोदा [ माव ] ता.परतुर येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
प्रेरक व तज्ञ मार्गदर्शक श्री देविदास आठवे सर यांनी विद्यार्थ्यांना विवीध ऊदाहरणे देवुन अभ्यास कसा करावा - स्पर्धा परिक्षेची तयारी - वाचन - लेखन - चिंतन -मनन या विषयी प्रेरणादाई असे मार्गदर्शन केले.
    बाल वयातच आपले ध्येय निश्चित करुन ध्येयाच्या पुर्ततेसाठी कठोर मेहणत करण्याची तयारी प्रत्येक विद्यार्थ्यांने मनात बाळगली पाहीजे.असे प्रतिपादन केले.
चांगल्या सवयी आपणास ध्येयापर्यत पोहचण्यास मदत करतात.तेव्हा प्रत्येकाने मोबाईल , टि.व्ही. चा आवश्यक तेवढाच वापर करावा असे आग्रही प्रतिपादन केले.
दरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरेश पाटोदकर यांनी मुख्य मार्गदर्शक श्री देवीदास आठवे यांचे शाल पुष्पहार घालुन स्वागत केले. 
     ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधे प्रचंड क्षमता असते त्या क्षमतेचा ऊपयोग करुण प्रत्येकाने मोठे यश मिळवावे व त्या साठी प्रेरणा मिळावी म्हणुन या ऊपक्रमाचे आयोजण करण्यात आल्याचे सांगितले .
    प्रास्ताविक श्री पाराजी रोकडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयाचे सहशिक्षक सर्वश्री गाडेकर , ऊध्दव खवल , , कुळकर्णी , जोशी , खवल चत्रभुज , डवरे , वखरे व मोठ्या संख्येने विद्यार्थी ऊपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत