न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

विस्तार अधिकारी डॉ. अंजली कोळकर यांची राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कारासाठी निवड.

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
विस्तार अधिकारी तथा पदवीधर शिक्षिका यांची अविष्कार सोशल एज्युकेशन फाउंडेशन (एनजीओ) कोल्हापूर मराठवाडा शाखेच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार 2023 साठी निवड करण्यात आली आहे. अविष्कार फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षापासून कार्यरत संस्था आहे. संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करते. या वर्षाच्या पुरस्कारासाठी संस्थेच्या वतीने विस्तार अधिकारी डॉ. अंजली कोळकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण शैक्षणिक (प्रशासकीय कार्य) क्षेत्रात केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे आपणास राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन आपला गौरव करीत आहोत असेही दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे. या पुरस्काराने वि. अ. डॉ. अंजली कोळकर यांचे सर्वत्र स्वागत होत आहे सदरील पुरस्कार वितरण सोहळा दि. 26 मार्च रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत